Wednesday 11 July 2012

Expiry Date आलेली औषधं!!


औषधं त्यांच्या वैध कालावधीत घेतली तर तारक नाही तर मारक ठरतात. तशीच काहीशी अवस्था होती आपली वयाची 
बाविशी-तेविशी  ओलांडली कि. कारण Expiry Date जवळ आलेली असते ना!
प्रत्येक समारंभात लोक नजर ठेऊन असतात. उपदेशांचे डोस देणे सुरु होते.. प्रत्येक औषधाचा कडवट घोट घेतल्या नंतर जसा तोंडाचा वेडा वाकडा आकार होतो तसाच आपलं मूड 
वाकडा होतो असे विषय घरात निघाले कि. आणि मग आजवर दरवर्षी ज्या वाढदिवसाची आपण आवर्जून वाट पाहिलेली तो दिवस असा लवकर-लवकर का येतो? असं वाटू लागतं!  एकिकडे घरच्यांचं साम-दाम-दंड-भेद या चार हि नीतींच अवलंबन सुरु असतं आणि दुसरीकडे 
अगदी दोन तीन वर्षांपूर्वी लग्न झालेला  मित्र परिवार हि आपल्या अनुभवाचे बोल Expert Opinion असल्यासारखे  ऐकवत असतो.
जो तो ज्याच्या त्याच्या लेखी "वैध" असलेल्या कालावधीप्रमाणे आपली विल्हेवाट लावण्याच्या मागे असतो.

लग्न कुणाशी करावं हा तर नंतरचा भाग झाला, मुळात आजकाल लग्न करावं कि नाही यावरच आपलं एकमत होत नसतं. 
परिस्थितीअभावी अथवा परिस्थितीप्रभावी म्हणा, किंवा स्वत:ला वाटलं म्हणून अनेक जण आज एकटे राहात आहेत. प्रत्येकाची कारणं वेगळी, अनुभव वेगळे. हे प्रमाण जरी वाढलं असलं तरी तसं आजही हे समाजाला नं पटण्यासारखंच  आहे.

वेळेत लग्न आणि वेळेत मुल होणं is equal to successful life. हेच यशस्वी 
जीवनाचं समीकरण आज हि जोडलं जातं.
ज्याला त्याला फक्त आपल्याच लग्नाचा लाडू खायची घाई झालेली असते..
आहो 
पण फक्त लाडू वर थोडीच समाधान होतं  यांचं.. लाडू जिरत हि नसेल तोच पेढ्या साठी हात पुढे करतात (आजकाल तशी जिलेबी हि चालते म्हणा! ;) :P )


-पल्लवी वसंत डेंगळे 

1 comment: