Thursday 22 March 2012

Handle With Care!


तशी-काही-अशी आता उन्हाळयाची चाहुल लागली आहे, ऑफिस मधून घरी आल्यावर पटकन कोकम सरबत बनवलं.
प्यायला घेतलं आणि त्या काचेच्या ग्लासा कडे लक्ष गेलं. तसं स्टील च्या पेल्यात घेतलं तरी सरबताची चव तीच असते मग हा काचेच्या पेल्यात पिण्याचाच अट्टाहास का असावा?
आणि सहज एक गोष्ट जाणवली, माणसंही आपल्या आयुष्यात अशीच येतात ना काचेच्या ग्लासां सारखी, सेट मध्ये.. आणि ब-याचदा कितीही काळजीपूर्वक हाताळला तरी त्यातला एक-एक ग्लास फुटत जातो.. १२,६,४ चा सेट मोडतो.. कधी आपल्याच हातून निसटतो तर कधी इतर कुणाचा धक्का लागल्याने.. काहींशी विशेष जिव्हाळा असतो म्हणून तडा गेला तरी आपण ते सांभाळून ठेवतो! तर एखादा ग्लास काहीही न होता आपसूक च दीर्घकाळ टिकून राहतो..
जिवाला रुख-रुख लागते खरी पण आरंभ तेथे शेवट हा तर निसर्ग नियमच.
"आपल्यापरीने सांभाळणं" आपण एवढाच करू शकतो.
तसं थांबत काहीच नसतं. पुन्हा कुठून तरी एखादा नवा ग्लास सेट गिफ्ट येतो आणि आपल्या पुढच्या उन्हाळ्याची सोबत होतो......

No comments:

Post a Comment